HW News Marathi
महाराष्ट्र

मी अपक्ष आहे, कुठल्याही पक्षात गेलो तरी अडचण नाही !

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सिल्लोड येथील काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंची भेट घेऊन तब्बल अर्धा तास चर्चा केली. या भेटीनंतर सत्तार हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सत्तार यांचा भाजपमधील पक्षप्रवेश लांबल्याने त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आगामी तीन महिन्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत.

दोन्ही नेत्यांची चर्चा झाली की माझा निकाल लागेल. मी अपक्ष आहे, कुठल्याही पक्षात गेलो तरी अडचण नाही. मला निवडणूक तर लढवायचीच आहे, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांना दिली. अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीतील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज भरला होता आणि शिवसेना बंडखोर हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला होता. सत्तार यांनी आपला उमेदवारी अर्जही मागे घेतला होता. मात्र पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

शिवसेना-भाजपची युती असल्याने दोन्ही नेत्यांशी चर्चा करावी लागले. टरबुजा सुरीवर पडला काय, आणि सुरी टरबुज्यावर पडली काय, टरबुजा तर कापणारच. म्हणजे शिवसेनेत गेलो काय आणि भाजपात गेलो काय, मला तिकीट मिळणारच आहे, नाही तर अपक्ष लढू, असेही अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीमा-कोरेगाव प्रकरणातील ३४८ गुन्हे मागे घेतले, गृहमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती

swarit

डॉ.कृष्णा किरवले यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करा : रामदास आठवले

News Desk

शरद पवार, गौतम अदानी बारामतीत ‘या’ उद्घाटन सोहळ्यासाठी हजर

News Desk